गर्भधारणेतील गुंतागुंतीबरोबरच उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया, गर्भरपणातील मधुमेह, बाळामध्ये गुणसूत्रातील विकृती, मुदतपूर्व जन्माचा धोका वाढत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा आहे. सध्या अनेक मुली करिअरमुळे उशीरा लग्न आणि गर्भधारणेची उशीरा योजना आखत असल्याने वय वाढत जातं. बऱ्याचदा महिला 40 व्या वयानंतर गर्भधारणेचा निर्णय घेतात.